लाडकी बहिण योजना यादिवशी जाहीर होणार लाभार्थी यादी | Ladki Bahin Yojana List

Ladki Bahin Yojana List महाराष्ट्र राज्यात सध्या सुरू असलेल्या सर्वात महत्त्वाच्या योजनांपैकी एक म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेसाठी आता सर्व दूर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याची आपण पाहत आहे. यामध्ये बऱ्यापैकी महिलांनी आता आपले अर्ज एप्लीकेशन मध्ये जाऊन सबमिट देखील केलेले आहेत तर काहींनी आपल्या गावातील अंगणवाडी सेविका असते अथवा महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन आपले अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्रे जमा केलेली आहेत. या योजनेचा पहिला हप्ता असेल अथवा लाभार्थी यादी असेल याबाबत देखील आता अपडेट देण्यात आली असून तुम्ही या योजनेचा अर्ज भरला असल्यास खाली दिलेली माहिती तुम्ही सविस्तर पाहायची आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

माझी लाडकी बहिण योजना अर्ज करण्याची मुदत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची अधिसूचना किंवा शासन निर्णय दिनांक 28 जून 2024 रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 01 जुलै 2024 पासून करण्यात आली आहे. अर्ज करण्याबद्दल सुरुवातीला अनेकांच्या मनात शंका होत्या की या योजनेसाठी नेमका अर्ज कसा करायचा आहे परंतु सरकारने या योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया उपलब्ध करून दिली.

ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या स्वतःच्या मोबाईलवरून नारीशक्ती दूत या मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे सर्व पात्र महिला आपले अर्ज करू शकत होते आणि ज्यांना मोबाईल वरून शक्य नाही अशा महिलांसाठी अंगणवाडी सेविकांद्वारे देखील अर्ज प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली होती. सदरील योजनेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 30 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना पात्रता

या योजनेच्या पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास सुरुवातीला असणाऱ्या सर्व जाचक अटी काढून केवळ पात्र महिलांना आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे ज्यामध्ये गरजू महिलांसाठी ही महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे. सुरुवातीला असणाऱ्या जाचक कागदपत्रांच्या अटी देखील काढून आता अगदी काही मोजक्या कागदपत्रांमध्ये तुम्ही या योजनेसाठी तुमचा अर्ज करू शकणार असल्याने योजनेसाठी लाभार्थी असलेल्या महिलांची संख्या यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे आणि म्हणूनच महिलांमध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे.Ladki Bahin Yojana List

  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी.
  • लाभार्थी महिलेचे वय २१ ते 65 वर्ष दरम्यान असावे.
  • लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र आहेत.
  • लाभार्थी महिला किंवा तिच्या कुटुंबातील व्यक्ती इन्कम टॅक्स भरणारा नसावा.
  • लाभार्थी महिला किंवा तिच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरदार अथवा पेन्शन धारक नसावा.
  • लाभार्थी महिला किंवा तिच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर ट्रॅक्टर वगळता चार चाकी वाहन नसावे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी

अर्ज करण्यासाठी ०२ महिन्यांची मुदत जरी असली तरी पहिल्या टप्प्यात अर्ज भरणाऱ्या महिलांची लाभार्थी यादी प्रसिद्ध केली जाणार असून यामध्ये काही चुका असल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी देखील महिलांना वेळ दिला जाणार आहे त्यामुळे पहिली संभाव्य यादी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळेच पहिल्या टप्प्यात अर्ज करणाऱ्या महिलांना जर काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी देखील वेळ दिला जाणार आहे सरकारद्वारे लाभार्थी महिला या लाभांपासून वंचित राहता कामा नये यासाठी या सर्व बाबी तपासल्या जात आहेत.

Ladki Bahin Yojana List

लाभार्थी यादी जरी लवकर प्रसिद्ध केली तरीदेखील हप्ते ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अथवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व लाभार्थी व पात्र महिलांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत. आणि त्यानंतर पुढील सर्व हप्ते हे दर महिन्याला आपोआप बँक खात्यावर जमा होणार आहेत यासाठी महिलांना पुन्हा कोणत्याही प्रकारची अर्ज करण्याची आवश्यकता नसणार आहे.

योजनेचा अर्ज करण्याचे नवीन एप्लीकेशन डाऊनलोड करण्यासाठी – येथे क्लिक करा